Thursday, 27 June 2013
हे राजुरा येथील सर्वात जुने व सर्वात भक्कम मंदिर आहे .या मंदिराचा महत्वाचा भाग म्हणजे गाभारा हा जवळ जवळ १२५ वर्षापूर्वी बांधलेला आहे .या मंदिराचा भक्कमपना व याचे बांधकाम याला पूर्ण तालुक्यात तोड़ नाही .या मंदिरात पूर्वी डाव्या बाजूला विहीर व उजव्या बाजूला छोटी रूम होती जी पूजासामान ठेवण्यासाठी वापरली जायची,आताहि ती तशीच आहे .मंदिराच्या बाहेरची बाजु ही ३० वर्षापूर्वी बांधलेली आहे. मंदिराच्या बाहेरील उजव्या बाजूला ग्यानबा महाराजांची समधी आहे ,ज्यांनी मीरजापुरच्या मारुतीची स्थापना केली .गावकरी जेव्हा पावसाची वाट पाहून थकतात तेव्हा ते मारुतीला साकडे घालुन भंडार्याचे (परुचे )व हनुमान जयंती आयोजन याच ठिकाणी करतात .
Subscribe to:
Posts (Atom)
